भद्रक – ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यात विषारी दारूने तीन जणांचे बळी गेले असून या दारूची अन्य 29 जणांना बाधा झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बाधितांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्याच्या निमीत्ताने मतदारांना जे पैसे वाटण्यात आले त्यातून आम्ही ही दारू विकत घेतली. लोकल मार्केट मधून त्यांनी ही दारू विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इलेक्शन नंतरची पार्टी म्हणून काहीं जणांनी एकत्रितपणे हे मद्यप्राशन केल्यानंतर त्यांना हा विषबाधेचा त्रास झाला. या घटनेचीमाहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी भद्रक-चंदाबली रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. यातील बाधितांवर भद्रकच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून काहींची दृष्टीही अधु झाल्याचे सांगण्यात येते.