तळेगाव ढमढेरे – येथील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या चोरट्यास शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी आहे. तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी रवींद्र भुजबळ यांची विद्युत मोटार ही काही दिवसांपूर्वी चोरी गेली होती. या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शिक्रापूर पोलिसांनी कसून शोध घेत आरोपी सोमनाथ शितोळे (रा. कासारी), दत्तात्रय सगळगीले, प्रफुल्ल संदीप शेळके (दोघेही रा. तळेगाव ढमढेरे) या आरोपींना ताब्यात घेतले.