घंटागाडीचे लोकार्पण : गावात राबवले जाताहेत समाजोपयोगी उपक्रम
शिंदे वासुली- चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील अवघ्या पाच वर्षांत गावामध्ये विविध विकास योजना राबवून विकास प्रक्रियेत प्रगतीपथावर असलेल्या वासुली येथील ग्रामपंचायतीने माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुरेश पिंगळे देशमुख यांच्या प्रयत्नातून वासुली एमआयडीसी हद्दीतील आयनॉक्स एअर प्रोडक्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा संकलनासाठी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.
वासुलीच्या सरपंच इंदुबाई शेळके व तत्कालीन उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख यांनी सहकारी ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून गावात विविध समाजोपयोगी योजना राबवून वासुलीचा कायापालट केल्याने वासुली ग्रामपंचायत प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला कंपनीने गाव व परिसरासाठी एक रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु पिंगळे यांनी कंपनी व्यवस्थापनाला कचरा संकलनासाठी घंटागाडीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती.
अखेर कंपनीने वासुलीला घंटागाडी देऊन कचरा व्यवस्थापनासाठी सहकार्य केले आहे. या घंटागाडीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे मुंबई येथील व्यवसाय प्रमुख चंदन डे, पुण्याचे कमल कपूर, प्रकल्प प्रमुख निलेश जांभळे, वरिष्ठ मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापक संदीप केळकर, एचआर व्यवस्थापक अनिल पाटील, सरपंच इंदुबाई शेळके, उपसरपंच कांताबाई गावडे, माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख, पोलीस पाटील अमोल पाचपुते, ग्रामपंचायत सदस्या छाया जांभळे, मोहन पाचपुते, विशाल शेळके, बाळासाहेब गायकवाड, आकाश शेळके, विजय कलवडे, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
- “शुन्य कचरा गाव’चे उद्दिष्ट
यापुर्वीच ग्रामपंचायतने 26 जानेवारीला प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा साठवण्यासाठी घरटी दोन कचरा डब्याचे वाटप केले होते. आता घंटागाडीची व्यवस्था झाल्याने गाव कचरा मक्त होणार आहे. तसेच कचरा संकलनासाठी अजून गरज भासल्यास ग्रामपंचायत स्वत: नवीन घंटागाडी विकत घेतल्याचा विचार आहे व पुढील काळात कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट उपक्रम राबवून स्वच्छ भारत व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानांतर्गत “शुन्य कचरा गाव ‘ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, सरपंच इंदुमती शेळके यांनी सांगितले.