पुणे : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत उमेश सुर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.पर्वती गाव येथील अखील भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू कॉलेज मध्ये ही स्पर्धा पार पडली. यावेळी जयंत काटकर यांना दुसरा तर सुजीत काळंगे आणि वैष्णवी बेंद्रे यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने ही महानेता आणि विकास आणि परिवर्तन राज्यस्तरीय वकृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यभरातील वेगवेगळया महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी स्पर्धकांना शेती आणि साहेब, क्रीडा आणि साहेब, समाज कारण आणि साहेब, उद्योग आणि साहेब, महिला धोरण आणि साहेब, आपत्ती व्यवस्थापन आणि साहेब असे वेगवेगळे विषय देण्यात आले होते.
यावेळी परिक्षक म्हणून डॉ. जिनत खान आणि निलेश पंब्रत यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले तर, या वकृत्व स्पर्धा साठी विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे , प्रमिलाताई गायकवाड ,नगरसेविका आश्विन नितीन कदम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे यांनी सहकार्य केले तर स्पर्धाचे नियोजन राष्ट्रवादी युवक चे पुणे शहर अध्यक्ष महेश हांडे , पर्वति मतदारसंघचे अध्यक्ष अमोल ननावरे , आश्विनी परेरा , ऋषीकेश भुजबळ , सौरभ माने , संतोष नांगरे , स्वप्नील थोरवे, गौरी जाधव, योगेश आमठे , रोहन ननावरे, विकास काकडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.