पिंपरी – ओएलएक्सवर लॅपटॉप विक्रीची जाहिरात पाहून संपर्कात आलेल्या व्यक्तीने महिलेच्या खात्यातील 40 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना काळेवाडी येथे 17 जानेवारी रोजी घडली.
काळेवाडी येथे राहणाऱ्या कुसुम नावाच्या महिलेन वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुसुम यांनी लॅपटॉप विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली. आरोपींनी कुसूम यांच्याशी संपर्क साधून ऑनलाइन पैसे पाठविण्याचा बहाणा करीत क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. कुसूम यांनी क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांच्या खात्यातील 40 हजार रुपये ऑनलाइन लंपास केले.