मुंबई – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘लाल कप्तान’चा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
New poster of #LaalKaptaan… Stars Saif Ali Khan… Directed by Navdeep Singh… Eros International and Aanand L Rai presentation… 18 Oct 2019 release. pic.twitter.com/mzg997Cu2y
— taran adarsh (@taran_adarsh) October 1, 2019
या नव्या पोस्टरमध्ये नागा साधूच्या भूमिकेत दिसणारा सैफ अली खान हातात बंदूक घेतलेला दिसूून येतोय. बंदुकीच्या नळीवरुन घोडेस्वार आक्रमक झालेले दिसतात. हे अनोखे पोस्टर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे.
‘लाल कप्तान’ चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग हे करत आहेत. तर, आनंद एल. राय हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. १८ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.