मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून सायंकाळी घरी सोडण्यात आले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांना ब्रिच कॅंडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर डॉ. फारूक उदवाडीया यांच्या नेतृत्वाखलील पथक उपचार करण्यात आले.
दोनच दिवसांपुर्वी त्यांची भाची पद्मिनी कोल्हापुरे यांचा फोटो ट्विट केला होता. हा फोटो आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत या चित्रपटातील होता. त्यांनी या ट्विटद्वारे पानिपतच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. 28 सप्टेंबर रोजी लतादीदींनी वयाची नव्वदी पार केली होती. माधुरी दीक्षीत, अनिल कपूर, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल यांनी त्यांना लवकर बऱ्या होण्यासाठी समाज माध्यमांवर शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या भगिनी आशा भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना सायंकाळ किंवा उद्या सकाळी घरी सोडण्यात येईल, असे दुपारी सांगितले होते. दरम्यान त्यांना पूर्ण आराम वाटू लागल्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला.