पुणे : करोनासंकटामुळे उद्भवलेल्या कठीण संकटाच्या काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून शहरातील अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला आहे. शहरासाठीची पक्षाची सामाजिक बांधिलकी जपत शहरातील अनेक करोनाग्रस्तांना पहिल्या टप्प्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड, गंभीर रूग्णांसाठी प्लाज्मा तसेच रूग्णांना वेळी- अवेळी तातडीनं रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यासाठी युवक अध्यक्ष महेश हांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजाविली.
शहरात गेल्या दिड वर्षांपासून करोनाचे संकट आहे. या स्थितीत शहरातील करोना साथीच्या नियंत्रणासाठी वारंवार लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. मात्र, या स्थितीत, हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य गरजूंचे मोठया प्रमाणात हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात सुमारे 1300 अन्नधान्यांच्या कीटचे वाटप करण्यात आले होते, त्यानंतर आता दुसऱ्या लाटेतही कार्यकर्त्यांकडून दररोज जेवणांच्या पाकीटांचे वाटप, अन्नधन्य कीट वाटप करून नागरिकांमध्ये करोना रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. या शिवाय, गरजूंना मास्क वाटप , सॅनिटायजार वाटप, सुरक्षा कर्मचारी , पोलीस बांधव ना थर्मल गन, ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात येत आहे. त्याचा लाभ अनेकांना होत असून त्याबाबत रूग्ण, डॉक़्टर तसेच मदत करण्यात आलेल्या वेगवेगळया घटकांकडून युवा कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही पक्षाची शिकवण आहे. याच शिकवणीचा आदर्श घेऊन लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून अनेक गरजूंना शक्य तेवढी मदत करण्यात आली, मदतीचे हे काम अद्यापही सुरूच असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार, गरजूंना सर्वोत्परी मदत केली जात आहे.
महेश हांडे ( राष्ट्रवादी युवक क़ॉंग्रेस अध्यक्ष, पुणे शहर )