नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन आज अत्यंत साधेपणानेच साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!”, असं ट्विट मोदींनी केलं आहे.
ગુજરાતની જનતાને રાજ્યના સ્થાપના દિવસની ખૂબ ખૂબ શુભેચ્છાઓ ! ગુજરાતની પ્રજા પુરુષાર્થ માટે જાણીતી છે. ગુજરાતીઓએ ઘણાં બધાં ક્ષેત્રોમાં વિશેષ યોગદાન આપ્યું છે. ગુજરાત સદૈવ સિદ્ધિઓનાં નવાં શિખરો સર કરતું રહે એવી મનોકામના… જય જય ગરવી ગુજરાત !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020
महाराष्ट्र दिनाबरोबर मोदींनी गुजरातमधील नागरिकांनाही गुजरात स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुजराती लोकांनी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले आहे, असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.