रांजणगाव गणपती- रांजणगाव गणपती येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सरपंच सर्जेराव खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम जाहीर करण्यात आले. आठवडे बाजार तळाच्या नावाचे नूतनीकरण करून महागणपती आठवडे बाजार तळ, असे नामकरण करण्यात आले. वृक्षारोपण करून एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवण्यात आली.
उपसरपंच राहुल पवार यांच्याकडून गावातील 20 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये असे एकूण 2 लाख रुपये मदतीचा धनादेश स्वरुपात देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने महाविद्यालयात 5वी ते 10वी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर पाटील, माजी आदर्श सरपंच भिमाजी खेडकर, श्रीकांत पाचुंदकर पाटील, उद्योजक राजेश लांडे, रघुनाथ फंड,प्रा. माणिकराव खेडकर, बापूसाहेब शिंदे, महेश फंड, भानुदास शेळके, प्रताप फंड, रोहिदास खेडकर, बाळासाहेब फंड, विनायक खेडकर, माणिक पवार, मुख्याध्यापक एस. जे.वेताळ, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे मान्यवर उपस्थित होते.