योन्गोन (म्यानमार) : म्यानमारमधील रखाईन बंडखोरांनी ओलिस ठेवलेल्यांपैकी 60 वर्षीय भारतीय कामगाराचा आज मृत्यू झाला. या कामगारासह म्यानमारचे काही जण आणि एक लोकप्रतिनिधीला बंडखोरांनी ओलिस ठेवले होते, असे प्रसार माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
विनू गोपाल असे मरण पावलेल्या भारतीय कामगाराचे नाव आहे. त्यांच्यासह 10 जणांचे रविवारी अरकन आर्मीने चीन प्रांतातील क्याकतॉमधील पालेवाल भगतून दोन बोटींमधून अपहरण केले होते. या 10 जणांमध्ये 4 भारतीय आणि आंग सान त्स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसीचे खासदार यू व्ही टिन यांचा समावेश आहे. भारतीय कामगार कलादान मल्टी-मोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्टवरील सुरू असलेल्या बांधकामात सहभागी होते.
अरकान आर्मीने चार भारतीय, दोन अनुवादक आणि दोन बोट चालक यांच्यासह आठ जणांना सोडले तेंव्हा भारतीय कामगारच्या मृत्यूविषयीची घटना उजेडात आली. या सर्वांना गोपाळ याच्या मृतदेहासह क्यूक्टाव पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी सकाळी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.