धांडे हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया
बेल्हे – रुग्णासाठी डॉक्टर हेच देव असतात कारण ते त्याचे प्राण वाचवतात. देवासमान असणाऱ्या डॉक्टरांनी 17 वर्षीय युवतीच्या पोटातून साडेपाच किलोची गाठ काढून तिला संकटातून वाचवले आहे. विशेष म्हणजे कोणतेही टाके न घातला दुर्बिणीच्या सहाय्याने दीड तास शस्त्रक्रीया केली. हे यश आहे आळेफाटा (ता. जुन्नर) येथील धांडे मल्टिस्लेशालिस्ट हॉस्पिटमधील डॉक्टरांचे.
पोटात दुखत असल्याने एक युवती हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी या युवतीचे पोट फुगलेले दिसून आल्यामुळे सोनोग्राफी केली असता पोटात गाठ असल्यास डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर एमआरआय केल्यानंतर ती गाठ कॅन्सरची असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेत दुर्बिणीद्वारे युवतीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. राजेंद्र धांडे, डॉ. प्रियश हलगावकर, डॉ. यशोधन देशपांडे, डॉ.कुणाल शिंदे या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.ऑपरेशन झाल्या नंतर 24 तासात त्या युवतीला डिस्चार्ज देण्यात आला. करोना महामारी च्या काळात देवदूत ठरत असलेल्या डॉक्टरांचे अशाही पद्धतीने काम असल्यामुळे डॉक्टरांचं परिसरातून कौतुक होत आहे.
- गाठ अंडाशयाच्या ट्युमरची
युवतीच्या पोटातील गाठ अंडाशयाच्या ट्युमरची बनलेली होती. यामध्ये दीड किलो सॉलिड पार्ट व चार किलोचे पाणी आढळून आले.