मुंबई – कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते ‘अनुपम खेर’ यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः अनुपम खेर यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
अनुपम खेर यांच्या आई कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून, त्यांना मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, त्यांचा भाऊ, वहिनी, पुतणी यांना सुद्धा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अनुपम खेर यांनी आईला सांगितले नाही कि ‘मला आईची फार चिंता होतेय. कारण रुग्णालयात उपचार घेताना देखील ती शांत राहात नाही. ती सतत आमची चिंता करत असते. त्यामुळे आम्ही आईला तिला करोना झाल्याचं सांगितलेलं नाही. मात्र सभोवतालच्या वातावरण पाहून कचादित तिला कळतंय की ती इथे का आली आहे.” अशा आशयाचं संभाषण अनुपम खेर यांनी आपल्या चाहत्यांसोबत केलं.