मौजमजेसाठी वाहनचोरी करणारी तरुणांची टोळी जेरबंद
पुणे,दि.24
मौजमजा करण्यासाठी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून दुचाकी चोरुन त्याची ग्रामीण परिसरात विक्री करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीसांच्या हडपसर पोलीस ठाण्यातील पथकास यश आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून वेगवेगळया कंपनीच्या 12 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या एकूण 25 मोटार सायकल जप्त करण्यात आले आहे.
संजय हरिष भोसले (वय-20, मु.रा.वासी, जि,उस्मानाबाद), ऋषिकेश बाबासाहेब डोंगरे (19,रा.लातूर), अभिषेक अनिल भडंगे (19,रा.चिंचोली, लातूर) आणि अजित कैलास कांबळे (21,रा.हवेली,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांचे पथक हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, मगरपट्टा चौक हडपसर येथे चार इसम संशयितरित्या वाहन पार्कींग मध्ये वाहनांची पाहणी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संशयितरित्या फिरणाऱ्या सदर चौघांना पोलीसांनी विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी वाहनचोरी करत असल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून हिरो होन्डा कंपनीच्या सप्लेंडर, पॅशन, युनिकॉन व ऍक्टिव्हा अशा एकूण 12 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 25 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. सदर आरोपींनी आणखीन वाहन चोरी केली असण्याची शक्यता असून त्याबाबत पोलीस तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी, सहायक पोलीस फौजदार युसूफ पठाण आणी कर्मचारी राजेश नवले, संपत औचरे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, अकबर शेख, शाहिद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे