मुंबई: राज्यातील सत्ता कोणत्याही स्थितीत कायम राखण्याचा वज्रनिश्चय करून भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तर अमित शहा यांच्या 20 सभांचे आयोजन केले आहे. राज्यातील महत्त्वाचे मंत्री आणि नेते पराभूत होऊ नयेत यासाठी पक्षाने कंबर कसली असून साताऱ्यातही या दोन नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
भाजपने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, कॉंग्रेस आणि मनसेचं आव्हान पेलण्यासाठी प्रचाराची व्युहरचना केली आहे. शिवसेनेलाही वाढू न देण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार नसणाऱ्या भागात या नेत्यांच्या अधिक सभा घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि इतर काही मोजक्या भाजपच्या नेत्यांच्या मतदारसंघातच मोदी-शहांच्या सभा होणार आहेत. साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली असल्याने उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठीही सभा घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुणे, नागपूर, नवी मुंबई, पनवेल या मतदारसंघात शिवसेनेचा एकही उमेदवार नाही भाग भाजपाचा गड बनवण्याची रणनिती आखल्याचे सूत्रांनी सांगितले.