पुणे,दि.18- मॉडेलिंगसाठी 15 वर्षाच्या मुलीला कास्टींग करण्याचे आमिष दाखवत एका महिलेची एक लाखाची एक लाखाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात हितेश नरेंद्र संपत याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला पिसोळे येथे रहाते तीच्या फेसबुक अकाऊंटवर जीग्नाशा अँड फॅशन फोटो शुट अशी जाहीरात आली होती. तीने पेजला लाईक करुन त्यांच्या 15 वर्षाच्या मुलीच्या कास्टींगसाठी आरोपीच्या नंबरवर संपर्क साधला. यानंतर फोटो शूट करता करारनामा केला. हा करारनामा 1 लाख 86 हजार रुपयांचा ठरला होता. यापैकी कॉस्च्युम आणी डिपॉझीटसाठी 1 लाख 4 हजार 900 रुपये फिर्यादीने ऑन लाईन पध्दतीने आरोपीला दिले. पैसे दिल्यानंतर वेळो वेळी संपर्क साधूनही फोटो शूट न करता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महादेव कुंभार करत आहेत.