24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या : भिगवण पोलिसांची कारवाई
भिगवण- मेडद (ता. बारामती) येथील एकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला होता. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तीन आरोपींना 24 तासांत आरोपींना गजाआड केले. या खुनानंतर आरोपींना जेरबंद करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी आरोपींना अटक करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. प्रमोद ऊर्फ पिंटू आण्णा गावडे, राहुल आण्णा गावडे, आण्णा कृष्णा गावडे (सर्वजण रा. अकोले, ता. इंदापूर), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगन्नाथ गावडे यांचा पूर्व वैमनस्यातून (दि.3) रोजी खून करण्यात आला होता. या घटनेची फिर्याद बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. याप्रकरणी पाच संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे भिगवण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली. या खून प्रकरणातील आरोपी हे इंदापूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार भिगवण पोलिसांनी या तिन आरोपींना अटक करण्यासाठी सापळा रचला. भिगण पोलिसांनी 24 तासांच्या आत ही कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींना बारामती पोलिसांच्या हवाली केले आहे. हा तपास बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण प्रभारी पोलीस अधिकारी जीवन माने, वीर नाना, जे. आर. पवार, बापू हाडगले, धनंजय राऊत, माने अंकुश वेताळ दीपक आदी जणांनी सहभाग घेत्ला होता अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.