सर्व डाळींमध्ये मूग डाळीला आरोग्यासाठी सर्वात बेस्ट मानले जाते. मोठ्या प्रमाणात प्रोटीन असलेली ही डाळ पौष्टिक गुणांनी भरपुर असते. त्याचप्रमाणे मूग डाळ त्वचेवर नितळ सौंदर्यासाठी कमालीची फायदेशीर होऊ शकते. स्वास्थसाठी मूग दाळ फायदेमंद आहेच त्याशिवाय तुमच्या त्वचेसाठीही मूग दाळ तेवढीच फायदेशीर आहे. मूग डाळ आपल्या स्किन केयर रुटीन (Skin Care Routine)मध्ये सामाविष्ठ करण्यासाठी मूग दाळीचा पेसपॅक किंवा फेसस्क्रब तयार करु शकता. मूग दाळ त्वचाला मोइस्टराइज करू शकते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होते. एक छोटा चमचा मूग डाळ आवडत्या लोशनमध्ये मिसळा आणि स्कीनवर लावा. आठवड्यातून तीनवेळा हा प्रयोग करा. तुम्हाला त्वचेमध्ये फरक जाणवेल.
मूग डाळीचा फेसपॅक कोरडी आणि खरबरीत त्वचावर आधिक प्रभावी ठरू शकते. त्यासाठी मूठभर मूगडाळ रात्रभर दुधात भिजवा. सकाळी मिक्सरमधून त्याची लहान पेस्ट तयार करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिट चेहऱ्यावर लावा. वाळल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळा करा. काही दिवसांमध्ये तुम्हाला त्वचेमध्ये बदल दिसून येईल.
जास्त घाम येण्याची समस्या जास्त घाम येत असेल तर मूग डाळी पावडरला पाण्यात मिळवुन मालिश करा. घाम येण्याची समस्या दूर होईल. मूठभर मूगदाळ पाण्यामध्ये रात्रभर भिजू घाला. सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये चमचाभर तूप टाकून चांगले मिश्रण तयार करा. त्यानंतर ही पेस्ट १० ते १५ मिनिट चेहऱ्यावर लावा. पेस्ट वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
आजारी असल्यावर मूग डाळ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मूग डाळ ही पचण्यास सोपी असते. यामुळे आजारी लोकांनी मूग डाळ खाल्ल्याने फायदा होतो. उन्हामुळे अनेकांची त्वचा टॅन होते. मूग डाळीने ही टॅन त्वचा तुम्ही घालवू शकता. त्यासाठी मूठभर मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजू घाला. सकाळी मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या. यामध्ये थोड्याप्रमाणात दही आणि कोरफड मिसळा. तयार होणाऱ्या पेस्टला चेहऱ्यावरील किंवा हातावरील टॅन झालेल्या जागेवर लावा. पाच ते दहा मिनिटांनंतर थंड पाण्याने त्वचा धूवून घ्या.
चेहऱ्यावरील डेड स्किन आपली त्वचा खरबडीत करू शकते. मूग डाळीमुळे अशाप्रकारची डेड स्कीन नाहीशी होई शकते. मूग डाळीमुळे त्वचा आतून आणि बाहेरूनही मोइस्टराइज़ होते. त्यामुळे त्वचेवरील डेड स्कीन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.