- शोभा कदम यांचा पाठपुरावा : ग्रामीण भागातील 27 गावांना साहित्य वाटप
टाकवे बुद्रुक – आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम यांच्या पाठपुराव्यातून पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागातून सहा गावांना भजनी साहित्य, पंधरा गावांना बॅंजो साहित्य व सहा गावांना समाज प्रबोधन साहित्य वडगाव मावळ पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये वाटप करण्यात आले.
त्यामध्ये नवलाख उंबरे, टाकवे, मंगरुळ, बधलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, निगडे, आंबळे, माऊ, कचरेवाडी, कांब्रे, कोंडीवडे, करंजगाव, उकसान, शिरदे, गोवित्री, डाहुली, शिंदेवाडी अशा 27 गावांना साहित्य वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजूंना स्वयंरोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम यांनी उपलब्ध करून दिलेल्या सहित्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. मावळ तालुक्यातील प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे मत आमदार सुनील शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी आमदार सुनील शेळके, वडगाव नगरीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, भूविकास बॅंकेचे संचालक काळुराम मालपोटे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटन मंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, सहकार सेलचे अध्यक्ष नामदेव शेलार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण शेडगे, तालुका सरचिटणीस माणिक तांबोळी, सरपंच दत्तात्रय पडवळ, मोहन घोलप, सविता भांगरे, करुणा गायकवाड, गोपीचंद कचरे, रवींद्र शेलार, माजी सरपंच भिकाजी भागवत, भाऊसाहेब दाभणे, संतोष कोंढरे, बाळासाहेब शेटे, नामदेव बगाड, काळुराम भालसिंगे, संभाजी गुनाट, पांडुरंग पवार, नवनाथ ठाकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे, तुकाराम भांगरे, हरिभाऊ भसे, दिलीप बगाड, बजरंग तांबोळी, बबुतात्या पडवळ, संभाजी बधाले, रामदास तांबोळी, सर्व ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.