पुणे : केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 2017-18 या वर्षात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये पुणे महापालिकेस दहावा क्रमांक मिळाला होता. या क्रमांकासाठीचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच वितरीत करण्यात आले. महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, उपायुक्त माधव जगताप, डॉ. केतकी घाडगे, मुख्य स्वच्छता निरिक्षक आय.एस इनामदार यांनी महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्विकरला.
केंद्रशासनाकडून दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते. 2016-17 मध्ये या स्पर्धेत महापालिकेस 9 वा क्रमांक मिळाला होता, तर 2017-18 मध्ये हा क्रमांक 10 वर गेला होता. देशातील पहिल्या दहा शहरांना केंद्रशासनाकडून विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. 2017-18 या वर्षांसाठीच्या प्रमाणपत्र वितरणचा सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.