मनसेचे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर (45, रा. खडकमाळ अळी) यांच्यासह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभाग येथे आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन मंगळवारी करण्यात आले होते. याप्रकरणी आतिष जाधव (50,रा.चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वारेगट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेषा दाबाने होत नाही या कारणावरुन संग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलन केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए.एस.लाहोटे करत आहेत.