वॉशिंग्टन : बगदादामधील अमेरिकन दुतावासावरील इराण समर्थक निदर्शकांच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मध्यपुर्वेत ताताडीने 750 सैनिक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
दुतावासावर निदर्शकांनी हल्ला केल्यानंतर थोड्याच वेळात अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर मंगळवारी म्हणाले होते, अमेरिका मध्य पुर्वेत तातडीने लष्कर दाखल करण्यात येईल. तातडीने 750 जवान तैनात करण्यात येतील. येत्या काही दिवसांत आणखी सैन्य तैनात करण्यात येईल. अमेरिकी नागरिक आणि मालमत्तांच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. बगदादमध्ये काल जे घडले त्याची पुनरावृत्ती कधीच घडू देणार नाही.
अमेरिकी हवाई दलाने रविवारी इराक आणि सिरीयात हवाइर हल्ले घडवले होते. त्यात हश्द शाबी या संघटनेच्या सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मंगळवारी या संघटनेच्या निदर्शकांनी बगदादमधील दुतावासावर हल्ला चढवला होता. त्यात दुतावासाचा स्वागत कक्ष आणि पार्किंग पेटवून देण्यात आले होते.
इराक हा स्वतंत्र देश असून त्याच्या भूमीचा वापर युध्दभूमीसारखा करू देणार नाही, अशी भूमिका इराकने घेतली असून सैन्य तैनात केल्यास आणखी पेचप्रसंग वाढण्याची शक्यता आहे.