नगर – पैशांची बचत करणारे व करोनापासून बचाव करणारे भारत पेट्रोलियम कंपनीचे डिजिटल पेमेंट “अप’ नगरमध्ये सुरु करण्यात आले आहे. नगरमधील उद्योजक अनिल जोशी यांच्या हस्ते या ऍपचे अनावरण करण्यात आले.
भारत पेट्रोलियम कंपनीतर्फे डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सध्या आलेल्या करोना व्हायरसपासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी स्मार्ट ड्राईव्हव्हॉंलेट ऍप सुरु केले आहे.
क्यूआर कोड संकल्पनेवर आधारीत या ऍपच्या माध्यमातून देशातील भारत पेट्रोलीयम कंपनीच्या सर्व पेट्रोल पंपावर प्रत्येक डिजिटल व्यवहारावर त्वरित 0.75. टक्के कॅशबॅक कंपनीतर्फे दिले जाणार आहेत, अशी माहिती जोशी यांनी दिली.
नोटांच्या माध्यमातून करोनाचा प्रादुर्भावाचा धोका कायम आहे. त्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा, तसेच डिजिटल व्यवहार करता यावेत, यासाठी हे स्मार्टऍप सुरु केले आहे. नगरच्या सावेडी भागातील दीपक पेट्रोल पंपावर भारत पेट्रोलीयम कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक दिनेश गाडगीळ, जिल्हा समंवयक कैलास कुलकर्णी, विक्री अधिकारी प्रतिक गायकवाड आदींच्या उपस्थिती या ऍपचे अनावरण झाल्याची माहिती वितरक अनिल जोशी यांनी दिली.