कुरवली- ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती व कृषि महाविद्यालय, बारामती यांच्या वतीने बेलवाडी (ता. इंदापूर) येथे उसातील हुमणी व मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड, कलम तंत्रज्ञान, या विषयावर आयोजित चर्चासत्रास प्रतिसाद मिळाला. बारामती कृषि महाविद्यालयातील कृषीकन्या स्नेहा वाणी, स्नेहल कोरडे, कल्याणी लवांडे, संस्कृती दानवे, अपूर्वा चव्हाण, तनुजा दगडे, विनया गोपडी यांनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. कृषी विज्ञान केंद्रातील तुषार जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कृषीविषमुक्त भाजीपाला उत्पादन व विक्री, भाजीपाला रोपवाटिका वैशिष्ट्ये उत्पादन व विक्री, करार शेतीचे महत्व व संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सचिन क्षीरसागर यांनी मधमाशी पालनाचे महत्व आणि फळबागमध्ये मधमाशीचा उपयोग यावर मार्गदर्शन केले. ग्रामसेवक रमेश कर्चे यांनी आभार मानले.