टीव्हीवरील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या रियलिटी शो “बिग बॉस 14’बाबत चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. या शोसंबंधी अनेक गोष्टींच्या अपडेट्स आतापर्यत चाहत्यांना मिळाल्या आहेत. आता “बिग बॉ 14’च्या प्रीमियर डेटबाबत नवीन माहिती समजली आहे.
सलमान खानच्या शोचा चौदावा सीजन पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. बिग बॉसलचा आगामी सीजन 20 सप्टेंबरला टेलीकास्ट केला जाणार आहे. परंतु निर्मात्यांकडून अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र, कलर्सवरील हा शो सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे. सलमान खानचे चाहते या शोची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.
करोनाच्या काळखंडात या शोमध्ये खूप बदल करण्यात आलेले आहेत. बिग बॉस-14मध्ये जंगलची थीम पाहण्यास मिळणार आहे. यात मेन हाईलाइट लॉकडाउन असणार आहे. तसेच “बिग बॉस 14 होगा रॉकिंग’ अशी त्याची टॅगलाइन असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसच्या सेटवर करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच ट्रॅव्हल हिस्ट्री असलेल्या कंटेस्टेंटला सहभागी करून घेण्यात येणार नाही. तसेच त्यांची करोना टेस्टही करण्यात येणार आहे. या शोमध्ये निया शर्मा, व्हिव्हियन डिसेना, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्झा आदी सेलेब्सची नावे चर्चेत आहेत.