बारामती- शहरातील निरीक्षक गृह (रिमांड होम) मध्ये दाखल असलेल्या 3 अल्पवयीन मुलांना पळविल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाबुद्दीन खान (वय 16), आशुदेव उल्के (वय 15), नयन चंदर चौहाण (वय 15) अशी पळवून नेलेल्यांची नावे आहेत. तर सचिन सदाशीव गायकवाड (वय 35, रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महाले करीत आहेत.