फिजोओथेरिपिस्टचा विनयभंग ; ज्येष्ठ नागरिक अटक
पुणे,दि.6-महिला फिजोओथेरिपिस्टचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकास मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. उपचारादरम्यान ज्येष्ठ नागरिकाने हे कृत्य केले. ही घटना मार्केटयार्ड गंगाधाम चौकातील वर्धमानपुरा सोसायटीमध्ये घडली.
शामसुंदर सिताराम कलंत्री(62,रा.वर्धमानपुरा सोसायटी, ए 106, गंगाधाम चौक, मार्केटयार्ड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी येथे रहाणाऱ्या एका 23 वर्षीय फिजोओथेरिपिस्टने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या आरोपी शामसुंदर कलंत्री यांच्या घरी फिजोओथेरिपीची ट्रीटमेंट देण्यासाठी रात्री नऊच्या सुमारास गेल्या होत्या. ट्रीटमेंट देत असतानाच कलंत्री यांनी फिर्यादीला तुझी देखील पाठ दुखत असेल, मी तुझी पाठ दाबुन रिलीज करुन देतो असे म्हटले. यानंतर जबरदस्तीने जवळ ओढून किस करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कलंत्री यांना अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक खटके करत आहेत.