राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय
पुणे : देशभरातील टोलनाक्यांवर वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या “फास्टॅग’ ला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नवीन मुदत 15 डिसेंबरची असणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.या सक्तीमुळे “फास्टॅग’ची अंमलबजावणी करण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच, वाहनधारकांमध्ये पुरेशी जनजागृती आणि “फास्टॅग’ मिळत नसल्याने प्रवासी वाहतूक संघटनांनी ही मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यास अखेर मान्यता देण्यात आली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.