पुणे : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण तसेच त्यांच्या कौशल्य विकासासाठी गरजू व होतकरू महिलांना सिंहगड रस्ता येथील जिव्हाळा सोशल फाऊंडेशन आणि आर.पी.जी फाऊंडेशनच्या वतीने मोफत जनरल डयूटी असिस्टंटचे ( नर्सिंग) प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे या अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून या महिलांना नुकतेच फाऊंडेशनच्या वतीने या प्रशिक्षणानंतर कामाच्या ठिकाणी दैनदिन लागणारे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ.राजेश टिळेकर,रावसाहेब पटवर्धन शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा हजारे,आर.पी.जी. फाऊंडेशन च्या दिपाली शिंदे, प्रा.किरण गायकवाड,यांनी मार्गदर्शन केले,
कार्यक्रमाचे आयोजन जिव्हाळा फाऊंडेशनचे संस्थापक माजी नगरसेवक राहुल तुपेरे, उपाध्यक्षा मीरा तुपेरे यांनी केले. कुणाल वाघमारे, अनिकेत कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.