नगर – शहर व उपनगरात सुरू असलेलया पॅचिंगच्या कामाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. यावेळी सुरु असलेले पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले असून, कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही वाकळे यांनी दिला.
यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी वाकळे म्हणाले, शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले होते. खड्डयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला परंतु पावसामध्ये डांबराने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेता येत नव्हते. परंतु मध्यंतरी पाऊस थांबल्यानंतर पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला त्यामुळे पॅचिंगचे काम थांबविण्यात आले होते. आता पाऊस उघडल्यानंतर पॅचिंगच्या कामास सुरूवात करण्यात आली आहेत.शहर अभियंता यांना पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.