श्रीनगर-जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले, असे लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. चेवा येथील कारवाईतही एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तर शुक्रवारी सकाळी आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. आतापर्यंत तीन दहशतवादी ठार झाले असून
चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून तपासणी सुरू आहे. चकमकीच्या ठिकाणी दोन एके-47 रायफली आढळून आल्या आहेत.गुरुवारी दहशतवाद्यांची माहिती मिळाल्याने दक्षिण काश्मीरमधील त्रालमधील चेवा उलार येथे सुरक्षा रक्षकांनी नाकाबंदी करून शोधमोहिम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा
रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. या दहशतवाद्यांना पळून जायची संधी मिळू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर रात्रीउशीरापर्यंत चकमक सुरू होती. आज सकाळी तिसरा दहशतवादी ठार झाल्यानंतर चकमक थांबली.