मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच त्याचा आगामी चित्रपट गोलमाल 5 च्या तयारीला लागणार आहे. कॉमेडी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गोलमाल सिरीजमधील सगळेच चित्रपट हिट ठरले आहेत. आता खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे, याची माहिती अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
A film franchise which is not only the longest running one in hindi cinema but also happens to be one of my favourites! Prepare yourself for yet another laugh riot with #GolmaalFive. #RohitShetty @Shibasishsarkar @RelianceEnt @RSPicturez pic.twitter.com/IDvpNb8K6E
— Ajay Devgn (@ajaydevgn) November 30, 2019
दरम्यान, रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ चित्रपटातच या चित्रपटाचा संकेत मिळाला होता. त्यामुळे ‘गोलमाल ५’ तयार होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे. या चित्रपटात अजय देवगनसोबतच गोलमालच्या इतर स्टारकास्टची पुन्हा धमाल पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेअस तळपदे आणि इतर कलाकारांच्या यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहेत. मात्र, यावेळी काही नवीन कलाकारांचाही यामध्ये समावेश राहणार आहे.