इस्लामाबाद: पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हिंदु मुलीवर हत्या करण्यापुर्वी बलात्कार करण्यात आल्याचे अवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे. निम्रिता कौर असे बिबि असिफा वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थीनीचे नाव आहे.
निम्रिता बिबी असिफा दंत महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकत होती. तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल चांडका वैद्यकीय महाविद्यालयाच्या ररुग्णालयाने जाहीर केला. त्यानुसार, तिचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाला. तिच्या गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत.
तिच्या गळ्यावरील खुणा या गळा दाबल्यामुळे झाल्या आहेत की गळफास घरतल्याने झाल्या आहेत, याबाबत तपास अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी. निम्रिताच्या कपड्यावर पुरषाच्या विर्याचे अंश सापडले आहेत. तसेच तिच्यावर बलात्कार झाल्याने वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले. या प्रकरणी लारकाना शहीद मोहतरमा बेनझीर भुत्तो वैद्यकीय विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पोलिस तपास सुरू होण्याआधीच या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे जाहीर केले होते.
सिंध प्रांतात दरवर्षी 12 ते 28 वयोगटातील सुमारे एक हजार मुलींचे अपहरण करून त्यांचा मुस्लिम धर्मीयांशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात येतो. त्याबाबत जगभरातून पाकिस्तानवर टीका होत असते.