अकलूज- माळशिरस तालुक्यातील पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्याने सहकार्य करावे असे अहवान सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले माळशिरस तालुक्यातील कोंडबावी येथे पहिल्या पांणद रस्त्याचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी शमा पवार, तहसीलदार अभिजीत पाटील, मंडलाधिकारी एच. सी. चांडोले, युवानेते राहुल वाघमोडे, कोंडबावीच्या सरपंच आलका कदम, उपसरपंच विष्णू घाडगे, अनिल माने, हरिभाऊ यादव, जगन्नाथ माने, रघुनाथ यादव, अनिल माने, सुरेश माने, रघुनाथ घाडगे, रघुनाथ यादव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले पुढे म्हणाले की, कोंडबावी (ता. माळशीरस) गावात पाणंद रस्त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.निधीसाठी प्रस्ताव पाठवा मंजूर करून घेऊ, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पहिला पाणंद रस्ता तयार होतो आहे. माळशिरस तालुक्यातीलपाणंद रस्ता योजनेअंतर्गत काही रस्ते राहिले आहे त्याचेही काम पूर्ण करण्यात यावे ,त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.