पुणे : तब्बल 75 मीटर लांबीचा राष्ट्रध्वज, जुन्या काळाची आठवण करून देणाऱ्या व्हिंटेज गाडया आणि स्वातंत्र्य सैनिक तसेच राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या बालचमूंसह भारत माता की जय !, वंदे मातरमच्य च्या घोषणा देत पर्वती भागात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सह सोहळा अभिनव पध्दतीने साजरा करण्यात आला. कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागूल यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा काढत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी या आगळया वेगळया सोहळयाचे जल्लोषात स्वागत केले.
या शोभा यात्रेची सुरूवात, गटनेते बागूल यांच्या हस्ते ध्वजारोहनाने करण्यात आली. यावेळी आता देश स्वतंत्र झाला असून सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यासाठी त्यासाठी सर्वानीच लोकशाही,सर्व धर्म समभाव, सामाजिक समता या आदर्श मूल्यांना सतत जगते ठेवले पाहिजे तसेच तरुण पिढीला या स्वातंत्र्याचा अर्थ समजून सांगणे क्रांतिकारकांचे,स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान सांगणे ही देखील आपल्या पिढीची जबाबदारी आहे. अशा भावना बागूल यांनी व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीत असणाऱ्या विंटेज कारमध्ये भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉ. डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी , मंगल पांडे, स्वर्गीय इंदिरा गांधी, सुखदेव व देशाचे रक्षण करणारे भारतीय जवान त्या त्या राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषेत हातात तिरंगी झेंडे घेऊन मुले सहभागी झाली होती, शहर कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागुल, उद्योजक धनंजय बदामीकर,नंदकुमार बानगुडे,घनशाम सावंत, सागर आरोळे,इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे,बाबासाहेब पोळके, अभिषेक बागुल, राम रणपिसे यांनी या यात्रेचे संयोजन केले.