पॅरिस : फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या अखेरीस पॅरिसमधील भारतीयांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील सांस्कृतिक ठेव्याचाही उल्लेख केला. तसेच उंबरठ्यावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाविषयी बोलताना पॅरिसमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे कौतुक केले. तसेच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. त्यानंतर उपस्थितांनीही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यास सुरुवात केली.
PM Narendra Modi in Paris: I was told that Ganesh Mahotsav has become an important part of Paris’s cultural calendar. On this day Paris looks like a mini India, which means in some days we will hear ‘Ganpati Bappa Morya’ chants here as well pic.twitter.com/cXwtUbwYa0
— ANI (@ANI) August 23, 2019
गणेशोत्सव हा पॅरिसमधील सांस्कृतिक कार्यक्रमामधील महत्त्वाचा सण असल्याचे मला सांगण्यात आले. त्या दिवशी पॅरिस शहर जणू छोटा भारतच भासतो. म्हणजेच त्यादिवशी तुम्ही इथेही गणपती बाप्पा मोरया असा जयघोष ऐकू शकता.” मोदींनी गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करताचा उपस्थित श्रोत्यांमधूनही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होऊ लागला.