नवी दिल्ली; येथील निजामुद्दीन मशिदीत जमत कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांमध्ये कोरोनाची`लक्षणे आढळल्याने निजामुद्दीन पश्चिम भागात नाकाबंदी केली आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कार्यक्रमामुळे देशात कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढली.
या मशिदीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला. साथीचे आजार कायद्याचे कलम २६९,२७०,२७१,२७१ आणि भा. दं.सं १२० बी प्रमाणे हा गुन्हा नोंदवण्यात आला.त्यामुळे खळबळ उडाली आहे याचा तपास गुन्हे शाखेने सुरु केला आहे.
दरम्यान,आरोग्य मंत्रालयाने मात्र वेगळी भूमिका घेतलीआहे. ‘हि वेळ चुक कोणाची याचा काथ्याकूट करण्याचा नाही. हि वेळ वेगाने कृती करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची आहे’, असे आरोग्य खात्याचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
या समारंभात मलेशिया,इंडोनेशिया येथील नागरिक सहभागी झाले होते. सुमारे २००० जण आलेल्या या कार्यक्रमानंतर दिल्लीतील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली