राज्य राखीव पोलीस दलाच्या विद्यार्थ्यांचे दिमाखदार संचलन
दौंड- राज्य राखीव पोलीस दलाचा दीक्षांत संचलन सोहळा नानविज (ता. दौंड) येथे आज (दि. 7) उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदारपणे पार पडला. या दीक्षांत सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आणि अप्पर पोलीस महासंचलक राज्य राखीव पोलीस दल अर्चना त्यागी यांच्या उपस्थित पार पडला. समादेशक नीलेश अष्टेकर यांच्या मार्गर्शनाखाली या प्रक्षिणार्थी विद्यार्थ्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिले असून, उत्तम सैनिक बनवून राज्याच्या प्रशिक्षण दलामध्ये सामील केले आहे.