देऊळगावराजे -दौंड शहरात करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या शहरातील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. जी. भोकरे यांनी दिली आहे.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी बाधित असलेल्या तीन रुग्णांना उपचारासाठी शासनाने जाहीर केलेल्या पिरॅमिड खासगी दवाखान्यात सोमवारी (दि. 3) पाठवले होते. त्यावेळी दवाखान्याचे प्रमुख समीर कुलकर्णी यांनी रुग्णांना उपचार करण्यास नकार दिला होता.
त्यामुळे डॉ. डांगे यांनी डॉ. समीर कुलकर्णी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.