मुंबई-विविध कारणांमुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे दर वेगळे असतात. यामध्ये एकसमानता आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
मलबार गोल्ड अँड डायमंड या कंपनीने देशभर सोन्याचे एकच दर ठेवण्याची घोषणा केली आहे. हे दर बीआयएस हॉलमार्कच्या 100 टक्के शुद्ध सोन्यासाठी उपलब्ध असतील, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांचे हितसंबंध जोपासले जातील, असे कंपनीला वाटते. आम्ही यासाठी बराच गृहपाठ केल्यानंतर ही योजना सुरू केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कंपनीच्या देशातील विविध शहरात 120 शोरूम आहेत.