मागील काही महिण्यांत ज्येष्ठ महिलांना केले होते टार्गेट ; दहा लाखाचा ऐवज हस्तगत
पुणे,दि.5- दुधाचा चिक व गावराण तुप विकण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना भुलथापा मारुन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात आले आहे.त्यांच्याकडून समर्थ, अलंकार, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड, चिंचवड व निगडे पोलीस ठाण्यात दाखल असलेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हयातील सेन्याचे 6 लाख 54 हजार 921 रुपयांचे(204 ग्रॅम) दागने व गुन्हयात वापरलेली बुलेट, तीन होंडा दुचाकी(किंमत 3 लाख 83 हजार) , तीन मोबाईल(किमंत33,000) असा एकूण 10 लाख 70 हजार 912 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
अशोक उर्फ काट्या विश्वनाथ गंगावणे(27,रा.विठ्ठलवाडी, बारामती), नवनाथ विष्णू वाईकर(27,रा.बांदलवाडी, बारामती), लंकेश पोपट वाईकर(22,बांदलवाडी, बारामती), सुनिल सोमनाथ वाईकर(30,रा.विठ्ठलवाडी, बारामती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अशोक गंगावणेवर सन 201 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात सोने चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
आरोपी म्हशीच्या दुधाचा चिक किंवा गावराण तुप विक्री करण्याच्या बहाण्याने शहरातील ज्येष्ठ महिलांना गाठत असते. या महिला घरात ऐकट्या असल्याचे लक्षात येताच त्यांना भूलथापा मारल्या जात. यानंतर विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने लूबाडले जात होते. ज्येष्ठ महिलांना ते माझ्या भावाने लग्न आहे, तुमच्या गळ्यातील चेन व मंगळसूत्रासारखे दागिने लग्नात बनवायचे आहेत, माझी आई खाली थांबली आहे तीला दागीने दाखवून आणतो अशा थापा मारत. यानंतर दागिने घेऊन ते दुचाकीवरुन पसार होत होते. यातील अशोक , नवनाथ आणी लंकेशला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत सुनिलचे नाव निष्पन्न झाल्यावर त्यालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, उत्तम बुदगुडे, हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी योगेश जगताप, सुधाकर माने, प्रकाश लोखंडे, अनिल घाडगे, अजय थोरात, मल्लीकार्जुन स्वामी, प्रशांत गायकवाड, अमोल पवार, सुभाष पिंगळे, बाबा चव्हाण, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, संजय वरकडे, श्रीकांत वाघवले, उमेश काटे, इरफान मोमीन, इम्रान शेख, तुषार खडके, सचिन जाधव, अशोक माने, विजेसींग वसावे, कैलास गिरी यांच्या पथकाने केली.