हरित लवादाचे आदेश
नवी दिल्ली : दिल्लीत रहिवासी भागातील 4,774 उद्योग बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. माजी न्यायाधीश प्रतिभा राणी यांच्या अध्यक्षतेखालील देखरेख समितीने दिल्लीतील वेगवेगळ्या महापालिकांच्या हद्दीतील रहिवाशी भागातल्या 4,774 उद्योगांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. समितीच्या अहवालाची दखल घेऊन हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांनी हे आदेश दिले आहेत.
या कारणे दाखवा नोटीसा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या दृष्टीने अनावश्यक असल्याचे दिल्लीच्या मुख्य सचिवांनी म्हटले आहे. हे उद्योग थेट बंद करण्यात येत असल्याने या नोटीसा चुकीच्या पद्धतीने बजावण्यात आल्या आहेत, अशी माहितीसमितीच्या अहवालाची दखल घेऊन हरित लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांनी हे आदेश असे मुख्य सचिवांनी म्हटल्याचे हरित लवादाने सांगितले.