ब्लॅकमेल करण्यासाठी व्हायरल; मित्रांच्या मदतीनेच पतीने रचला कट
स्थानिक गुन्हे शाखेकडून घटनेचा पर्दाफाश
नगर (प्रतिनिधी) -अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली असून हा गुन्हा चक्क ब्लॅकमेल करून जास्त पैसे मिळविण्यासाठी दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने विवस्त्र होवून पेट्रोल टाकून मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. याबाबत महिलेच्या पतीसह तिघे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
आरोपी गणेश सोपान झिरपे, अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे व महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरूण मुलाणी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्राथमीक चौकशीत पीडित महिला, व तिचा पती यांच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्यानुसार पीडित पतीच्या मित्रांची चौकशी केली असता हा मारहाणीचा व्हिडिओ मित्रांच्या मदतीने शहरातील एका शाळेतील खोलीत बनवला असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीस त्यांच्या मित्रांना ताब्यात घेतले.
ही कारवाई विषेश पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शिषिकुमार देशमुख, रवी सोनटक्के, दिपक शिंदे, मोहन गाजरे, सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, संतोष लोंढे, रविंद्र कर्डिले, प्रकाश वाघ, सागर ससाणे, योगेश सातपुते, मयूर गायकवाड, बाळासाहेब भोपळे यांनी आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरुण मुलाणी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात पती-पत्नीसह तीघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात 2016 मध्ये अत्याचाराची फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी 24 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथून पीडित महिला व तिचा पतीला रिक्षात बसविले. यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन आरोपींनी अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी दहा जणांनी अत्याचार केला अशी तक्रार आहे.
अधिक पैसे मिळविण्यासाठी बनाव केल्याची आरोपींकडून कबुली
आरोपीच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल केला आहे. हा गुन्हा यापूर्वीच पैसे घेवून मिटवायचा होता. मात्र समोरील नागरिक पैसे कमी देत होते. मात्र त्यांच्याकडून जास्त पैसे घ्यायचे असल्याने पतीने त्याच्या पत्नीस विवस्त्र करून गुन्ह्यातील आरोपींनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करतील व आरोपी हे मला गुन्हा माघे घेण्यासाठी जास्त पैसे देतील.
प्रकरण अंगलट येताच महिलेने घेतले विष
प्रकरण अंगलट येताच बदनामीच्या भीतीने महिलेने राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जिल्हा रुग्णालयात उचार सुरु असून तिची प्रकृतीची ठिक असल्याचे सांगण्यात आले.