पुणे : वडगाव जलकेंद्र शुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या राजीव गांधी पंपींग स्टेशनवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या केदारेश्वर व महादेवनगर टाकीवरील अवलंबून असणारा दैनंदिन पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने या दोन्ही टाक्यांद्वारे पाणी पुरवठया केल्या जाणाऱ्या कात्रज, कोंढवा तसेच बिबवेवाडीच्या काही भागात या पुढे आठवडयातून एक दिवस पूर्णपणे पाणी बंद असणार आहे. येत्या सोमवार ( दि. 19 जुलै) पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी या परिसराचे सात झोन करण्यात आले असून त्या झोन नुसार पाणीबंदचे दिवस निश्चित करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
केदारेश्वर टाकीवरून पुरवठा होणारा भाग या दिवशी पाणी असणार बंद
सोमवार – साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी,
मंगळवार : टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, सिंहगड कॉलेज
बुधवार – सुखसागरनगर भाग- (संपुर्ण)
गुरुवार : शिवशंभोनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, शिवशंभोनगर (काकडे वस्ती), काकडेवस्ती (उर्वरित), गाकुळनगर (रस्त्याचा भाग) गोकुळनगर (डोंगरचा भाग), वृंदावननगर
शुक्रवार : कोंढवा बु।।( गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिलव्ह्यु, सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोढवा बु।।, (भाऊ कामठे गल्ली), लक्ष्मीनगर (संपुर्ण)
शनिवार – राजीवगांधीनगर (संपुर्ण), चैत्रबन वसाहत, कृष्णानगर झांबरे वस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, ग्रीन पार्क अजमेरा पार्क, काकडेवस्ती,गल्ली क्र.1
रविवार – शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, H&M सोसायटी, पारगेनगर, 15 नंबर, आंबेडकरनगर, (संपुर्ण), पुण्यधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती.
महादेवनगर टाकीवरून पुरवठा होणारा भाग या दिवशी असणार पाणी बंद