पुणे – सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील नटराज दहीहंडी संघाच्या गोविंदानी सहा थर लावून फोडली. शनिवारी रात्री 9 वाजून 07 मिनिटांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष करत गोविंदा पथकाला प्रोत्साहित केले. यानिमित्त गोविंदा आणि गोपाळभक्तांची झालेली अलोट गर्दी.