“तु है मेरी किरण’ ; डर फिल्म स्टाईल ड्रामा भर रस्त्यात
पुणे,दि.3- एकतर्फी प्रेमातून तरुणीला चाकूचा धाक दाखवत भर रस्त्यात धमकावण्यात आले. तसेच माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत मित्राबरोबर दिसलीस तर दोघांनाही खल्लास करेल अशी धमकीही देण्यात आली. ही घटना सारसबागेजवळील पाटील प्लाझा समोर घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीसांनी सचिन माने याला अटक केली आहे.
एका 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार ती आणी आरोपी एकाच परिसरात रहाणारे आहेत. घटनेच्या दिवशी आरोपीने तीला गाडी आडवी घालत चाकूचा धाक दाखवला. यानंतर तु मला खुप आवडतेस , मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, तु तुझा मित्र ऋतीक याच्यापासून दूर रहा, तु माझी आहेत, नाहीतर तुम्हा दोघांना खल्लास करेल अशी धमकी दिली. तसेच ती महाविद्यालयातून बाहेर पडत असतानाही त्याने तीचा पाठलाग केला. फिर्यादी तरुणी ही बीएसस्सी करते तर आरोपी कोणताही कामधंदा करत नाही. याप्रकरणाचा तपास पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके करत आहेत.