मुंबई – बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सध्या स्काय इज पिंक चित्रपटाच्या प्रोमोशऩमध्ये व्यस्त आहे. यासोबतच तो आगामी ‘तुफान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. पुढच्या वर्षी गांधी जयंतीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून याची माहिती देण्यात आली आहे.
Farhan Akhtar in sports-drama #Toofan… Release date finalized: 2 Oct 2020… Directed by Rakeysh Omprakash Mehra… Produced by Ritesh Sidhwani, Rakeysh Omprakash Mehra and Farhan Akhtar… First look poster: pic.twitter.com/mkIBbeP50c
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2019
दरम्यान, फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा दोघेही या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल ६ वर्षांनी एकत्र येत आहेत. हा चित्रपट बॉक्सिंगवर आधारित आहे. हा बायोपिक नाही. मात्र, बॉक्सिंगपटूच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. २ ऑक्टोंबर २०२०ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.