चेन्नई: दिल्लीतील तबलिगी जमातच्या समारंभातून तामीळनाडूला परतलेल्या तब्बल 110 सदस्यांना करोनाची बाधा आढळली आहे. त्यामुळे त्या विषाणूचा संसर्ग झालेल्या तामीळनाडूतील रूग्णांची संख्या वेगाने 234 पर्यंत पोहचली आहे.
तामीळनाडूत एकाच दिवसात उच्चांकी 110 करोनाबाधित आढळले. ते सर्व दिल्लीहून परतल्याचे स्पष्ट झाले. नवे बाधित तामीळनाडूच्या 15 जिल्ह्यांमधील रहिवासी आहेत. तामीळनाडूतील सुमारे 1 हजार 500 रहिवाशांनी मागील महिन्यात दिल्लीतील तबलिगी जमातच्या समारंभाला हजेरी लावली. त्यातील 1 हजार 131 जण तामीळनाडूला परतले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.