रेडा- इंदापूर तालुक्यातील गावांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सहा गावातील विकास कामांसाठी चाळीस लाख रकमेचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या सामाजिक विकास योजनेतून बोराटवाडी शिंदे वस्ती साठे वस्ती रस्ता कॉंक्रीट करण्यासाठी आठ लाखांचा निधी तर निरगुडे येथे सोनवणे वस्ती रस्ता कॉंक्रीट करण्यासाठी बारा लाखांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे.तर निर्वांगी येथील चर्मकार वस्ती, बुद्ध कांबळे वस्ती, रस्ता कॉंक्रीट करण्यासाठी दहा लाख रुपये, तसेच निर निमगाव येथील विषय वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण व गोतंडी येथील मोरे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यामुळे वाड्या वस्त्यावर जाणाऱ्या कच्चा रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे.सहा गावातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे निधी मंजूर केल्याने विशेष अभिनंदन केले आहे.