भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांचा काँग्रेसवर पलटवार
नवी दिल्ली : भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजपला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली आहे. याचे पडसाद संसदेतही उमटले असून हे रावणाचे वंशज आहेत, अशी टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे.
हेगडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले कि, आज हे महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. हे रावणाचे वंशज आहे. श्रीरामाच्या पुजारीचा अपमान करत आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एवढ्यावरच न थांबता अधीर रंजन चौधरी यांनी हे सरकार गोडसेंचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेत संसदेत गदारोळ केला. चौधरी यांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, आम्ही भाजपचे लोक महात्मा गांधींचे खरे भक्त आहोत. हे लोक राहुल गांधी आणि सोनिया गांधींसारख्य खोट्या गांधींचे भक्त आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
Union Minister Pralhad Joshi in Lok Sabha: We, people of Bharatiya Janata Party, are the real bhakts. We are the real followers of Mahatma Gandhi. These people are the followers of ‘nakli’ Gandhi like Sonia Gandhi and Rahul Gandhi. https://t.co/c9qURUYBJ9 pic.twitter.com/0JWlnz51NY
— ANI (@ANI) February 4, 2020
दरम्यान, थेट महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे अनंतकुमार हेगडे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्या वक्तव्यामुळे हेगडे यांच्यावर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व नाराज झाले आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून हेगडे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्याबद्दल हेगडे यांना माफी मागण्याचा आदेश दिला जाऊ शकतो.